पुजा बोनकिले
अभिनेत्री आणि मेकअप आर्टीस्ट स्मिता शेवाळे यांनी व्यक्तिमत्त्व आकर्षक बनविण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत.
तुम्ही या पुढील टिप्स फॉलो करून प्रवाभ इतरांवर पाडू शकता.
सुंदर दिसण्यासाठी किंवा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मेकअप करणं गरजेचं वाटल्यास करा. स्वतःच्या कपड्यांबाबतीत, दिसण्याबाबतीत सतर्क राहा.
दिवसातला काही वेळ स्वतःसाठी घालविण्याबाबतीत आग्रही राहा. हक्काच्या वेळेमध्ये आवडणारी एखादी गोष्ट तरी करा.
कपड्यांच्या रंगसंगतीबाबत जागरूक राहा. स्वतःच्या चेहऱ्याच्या बाबतीत काळजी घेत राहा. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सेल्फ नॉलेज महत्त्वाचे आहे.
व्यायाम करणं, स्किन केअर, हेअर केअर प्रोटिन असणं हे अपरिहार्य आहे.
आत्मविश्वासामुळे तुम्ही आकर्षक दिसता. तुम्ही जे काही करत असाल, त्याबाबतीत दृढ विश्वास बाळगा. स्वतःवर रोज काम करत राहणं गरजेचं असतं.
आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींबाबत ऋणी राहा. प्रगतीसाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षाबाबत आग्रही राहा.