Swadesh Ghanekar
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.
स्मृती मानधना १०व्या षटकात १८ धावांवर रन आऊट झाली. तिने ३ चौकार खेचले होते.
भारताला ५९ धावांवर दुसरा धक्का बसला. प्रतिका रावल ३५ धावांवर पायचीत झाली
स्मृती मानधनाचा आजचा सामना हा १०० वा वन डे सामना आहे.
भारताकडून १०० वन डे सामने खेळणारी स्मृती सातवी खेळाडू ठरली आहे.
माजी कर्णधार मिताली राजने सर्वाधिक सामने खेळले आहेत, त्यानंतर झुलन गोस्वामीने २०४ मॅच खेळल्या आहेत.
भारताची सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौरने १४४, अंजुम चोप्राने १२७ व अमिता शर्माने ११६ सामने खेळले आहेत.
फिरकीपटू दीप्ती शर्माने भारतासाठी १०४ सामने खेळले आहेत आणि त्यानंतर स्मृतीचा ( १००) क्रमांक येतो.