Pranali Kodre
स्मृती मानधनाने आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत उपांत्य फेरीत बांगलादेशविरुद्ध ३७ धावांची खेळी केली. यासह तिने विश्वविक्रम केला आहे.
Smriti Mandhana
Sakal
स्मृतीने आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४७८८ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतकांचा समावेश आहे.
Smriti Mandhana
Sakal
त्यामुळे स्मृती आता महिला आणि पुरुष मिळूनही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिच्या पुढे आता कोणीही नाही.
Smriti Mandhana
Sakal
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्मृतीपाठोपाठ न्यूझीलंडची सुझी बेट्स (४७५८ धावा) आणि पाकिस्तानचा बाबर आझम (४५९६ धावा) आहेत.
Smriti Mandhana
Sakal
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष खेळाडूंमध्येही स्मृती पहिल्या क्रमांकावर आहे.
Smriti Mandhana
Sakal
तिच्यापाठोपाठ भारतीयांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हरमनप्रीत कौर असून तिने २०९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४३२७ धावा केल्या आहेत.
Harmanpreet Kaur
Sakal
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने १५९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ४२३१ धावा केल्या आहेत.
Rohit Sharma
Sakal
विराट कोहली चौथ्या क्रमांकावर असून त्याने १२५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ४१८८ धावा केल्या आहेत.
Virat Kohli
Sakal
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal