संतोष कानडे
साप आणि मुंगूस यांच्यातलं वैर सगळ्यांनाच माहिती आहे. दोघांच्या लढाईत अनेकदा साप नामोहरम झालेला आपण बघितलेला आहे.
दोघांच्या लढाईमध्ये तर अनेकदा मुंगूसच जिंकताना आपण बघितलेलं आहे. पण हे मुंगूस एवढं चिडतं का?
मुंगूस आणि सापामध्ये दुश्मनी असण्याचं कारण म्हणजे, मुंगसाची छोटी पिल्लं साप खातो, त्यामुळे मादी मुंगूस सापाचा जीव घेते.
इतरवेळी मुंगसाला सापाकडून धोका नसतो, परंतु साप मुंगसाची पिल्लं खात असल्याने मुंगूस सापाचं डोकं फोडून टाकतं.
मुंगूस विषारी सापांनाही घाबरत नाही. अंगामध्ये चपळता असल्याने ते सापाला छोट्याशा लढाईत गारद करतात.
मुंगसाचं अन्न हे छोटे सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, प्राण्यांची अंडी, फळ, पक्षी असं असतं.
मुंगूस सापाच्या डोक्यावर हल्ला चढवतं. त्यामुळे एका फटक्यात साप मरु शकतो. सापाचं डोकंच मुंगसाला आवडतं, असं अभ्यासक सांगतात.
दोघांच्या लढाईत अनेकदा साप हरतो तर मुंगूस जिंकतं. मोठा कोब्रा असेल तर त्याच्या चाव्याने मुंगूस गतप्राण होऊ शकतं.