साप घरात येण्याआधी मिळतात 'हे' ५ धोकादायक संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात

Yashwant Kshirsagar

उष्णतेचा कहर

उष्णतेचा कहर झाला आहे. अशावेळी बिळांमध्ये धग निर्माण झाल्याने साप बाहेर येऊ लागतात, परिणामी ते घरांत किंवा बागेत किंवा एखाद्या कोपऱ्यात लपून बसतात.

Snake warning signs

|

esakal

भक्ष्यावर हल्ला

हे साप सहसा दिसून येत नाहीत ते संधी मिळताच भक्ष्यावर हल्ला करतात. मात्र हे घडेपर्यंत आपण अनभिज्ञ राहतो. सापाशी गाठ पडणे हा कोणासाठीही निःसंशयपणे एक भीतीदायक अनुभव असतो.

Snake warning signs

|

esakal

विशिष्ट संकेत

निसर्ग आणि जीवशास्त्र असे सुचवते की, सापाच्या येण्याआधी काही विशिष्ट संकेत दिसून येतात. संकेत वेळीत जाणून वे तुम्ही एखादा मोठा धोका टाळू शकता.

Snake warning signs

|

esakal

कोणते संकेत?

साप घरात किंवा घराच्या परिसरात येण्याचे ५ संकेत कोणते आहेत हे या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Snake warning signs

|

esakal

विचित्र दुर्गंधीयुक्त वास

जर तुम्हाला तुमच्या घरातील एखाद्या कोपऱ्यातून, तळघरातून (बेसमेंट), कोठडीतून किंवा कपाटातून एखादा तीव्र वास येत असल्याचे जाणवले जो सडलेल्या काकडीसारखा, दमटपणासारखा किंवा ओल्या मातीसारखा असेल तर तुम्ही सावध झाले पाहिजे.

Snake warning signs

|

esakal

सापाची कात

जर तुम्हाला तुमच्या बागेत, छतावर, बाल्कनीत किंवा कोठडीमध्ये सापाने टाकलेली पातळ कात आढळून आली, तर असे समजा की त्या भागातून नुकताच एखादा साप गेला आहे किंवा तो सध्या जवळपास कुठेतरी आहे.

Snake warning signs

|

esakal

सरपटण्याच्या खुणा

साप सरपटत गेल्यामुळे मागे राहिलेल्या खुणा धुळकट भागात, मऊ मातीत किंवा वाळूमध्ये सहजपणे दिसून येतात. या खुणा साधारणपणे इंग्रजी अक्षर 'S' च्या आकारातील नागमोडी रेषांसारख्या दिसतात.

Snake warning signs

|

esakal

प्राणी गायब होणे

जर तुमच्या घरात किंवा घराच्या अगदी जवळच्या परिसरात आधी उंदरांचा सुळसुळाट होता, पण आता ते अचानक नाहीसे झाले असतील तर तिथे साप असण्याची शक्यता असते.

Snake warning signs

|

esakal

पाळीव प्राण्यांचे वर्तन

पाळीव प्राण्यांना सापांचा चाहूल आधी लागते. जर कुत्रे खोलीच्या एखाद्या विशिष्ट कोपऱ्याकडे, कपाटाखाली किंवा झुडपांच्या एखाद्या समूहाकडे पाहून भुंकू लागले किंवा जर ते भीतीने मागे सरकले तर सावध व्हा.

Snake warning signs

|

esakal

भारतात पहिलं दारूचं दुकान कधी सुरू झालं? काय होता उद्देश...

History of Liquor In India

|

esakal

येथे क्लिक करा