म्हणून भार्गवी चिरमुलेने मागितली रंगदेवतेची माफी

Anuradha Vipat

भार्गवी चिरमुले

मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनं नाटक, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे

Bhargavi Chiramule

नाटकाचे प्रयोग

सध्या भार्गवीच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचे प्रयोग मुंबई, पुणे, नाशिक येथे सुरू आहेत

Bhargavi Chiramule

नाट्यगौरव पुरस्कार सोहळा

नुकताच तेथे घडलेली एक गंमत भार्गवीनं नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.

Bhargavi Chiramule

असा एक क्षण

भार्गवी म्हणाली, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की, आपण त्या क्षणाला ‘ब्लॅंक’ होऊन जातो.

Bhargavi Chiramule

तसं झाल्यानंतर...

भार्गवी पुढे म्हणाली, परवाच्या प्रयोगाला असंच झालं होतं. मी स्टेजवर पूर्णपणे ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ झाले आणि तसं झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या डोळ्यांत ते दिसतं. मी विचार करतेय- वाक्य काय आहे

Bhargavi Chiramule

रंगदेवतेची माफी

भार्गवी पुढे म्हणाली त्या क्षणाला मला ते वाक्य आठवलं. फायनली मी ते वाक्य बोलली आणि म्हणून नाटक पुढे गेलं. नाही तर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं. पण, त्या दिवशी मी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली की, माझ्या हातून काय चुकलं असेल, तर मला माफ कर.

Bhargavi Chiramule

प्रकाश राज यांची 'ती' पोस्ट चर्चेत