Anuradha Vipat
बॉलीवूडच्या ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर माधुरी आपल्या पतीबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली होती.
लग्नानंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर अभिनेत्रीने सिनेविश्वापासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
माधुरी काही वर्षे अमेरिकेत राहिल्यावर २०११ मध्ये भारतात परतली.
आता तिने हा निर्णय का घेतला? याबद्दल माधुरीने एका दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
माधुरी म्हणाली, मुंबईत परतणं हा निर्णय आमच्या कुटुंबीयांसाठी खूपच सोयीचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता
माधुरी म्हणाली, “ माझे आई-वडील माझ्याबरोबरच राहत होते आणि त्यांचंही वय झालं होतं. त्यांना आपल्या देशात परत यायचं होतं. त्यामुळे आम्ही सुद्धा परतण्याचा विचार केला