सकाळ डिजिटल टीम
आरोग्य टिकवण्यासाठी आपण नियमितपणे बदाम, अक्रोड यांसारखी महागडी ड्रायफ्रुट्स खातो.
पण तुम्हाला माहीत आहे का, की स्वस्तात उपलब्ध होणारे जर्दाळू (Apricots) सुद्धा तितकेच पौष्टिक आहेत? विशेषतः रात्रभर पाण्यात भिजवून खालेले जर्दाळू शरीराला अविश्वसनीय फायदे देतात.
रात्रभर भिजवून ठेवलेले जर्दाळू सकाळी खाल्ल्याने शरीरातील आयरनची कमतरता भरून येते आणि थकवा, अशक्तपणा कमी होतो.
भिजवलेल्या जर्दाळूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास सहाय्य होते.
जर्दाळूचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे.
जर्दाळूमध्ये असणारे व्हिटॅमिन A डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.
जर्दाळू हे कॅल्शियमने समृद्ध असल्यामुळे हाडांची मजबुती वाढवतात आणि हाडांचे आजार टाळतात.