अक्रोड भिजवून खावेत की कच्चे? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत अन् फायदे!

Anushka Tapshalkar

कच्चे आणि मीठ नसलेले अक्रोड खा

कच्चे आणि मीठ नसलेले अक्रोड खाणे फायदेशीर ठरते. यामध्ये हेल्दी फॅट्स आणि ओमेगा-३ टिकून राहतात. तसेच अतिरिक्त सोडियम टाळता येते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Walnuts | Sakal

अक्रोड रात्रभर भिजत ठेवा

अक्रोड खायचे असल्यास ते ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे अक्रोड मऊ होतात आणि त्यांची कडवट चव कमी होते. मात्र, भिजवल्याने पोषक घटकांचे शोषण वाढते, याचे ठोस पुरावे नाहीत.

Soaked Walnuts

|

Sakal

दिवसातून किती अक्रोड खावेत?

अक्रोड पौष्टिक असले तरी दिवसातून २८ ग्रॅम म्हणजेच १४ अर्धे तुकडे खाणे पुरेसे आहे. यातून सुमारे १८५ कॅलरीज, हेल्दी फॅट्स आणि फायबर मिळते.

How Much Walnuts Per Day

| Sakal

रोजच्या आहारात अक्रोडाचा समावेश करा

अक्रोड ओट्स, सॅलड, दही किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता. तसेच पास्ता, पिझ्झा आणि भाज्यांमध्येही त्याचा वापर केल्याने चव आणि पोषणमूल्य वाढते.

Walnuts in Daily Diet

|

Sakal

व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांसोबत खा

अक्रोडासोबत संत्री, स्ट्रॉबेरी आणि आवळ्यासारखी व्हिटॅमिन सीयुक्त फळे खा. यामुळे शरीराला ओमेगा-३ आणि अँटीऑक्सिडंट्स मिळण्यास मदत होते.

Walnuts with Other Supplemets

| sakal

अक्रोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

अक्रोड सकाळी नाश्त्यात किंवा दुपारच्या स्नॅक्समध्ये खाऊ शकता. ओट्स किंवा फळांसोबत खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते. मात्र, ते खाण्यासाठी ठरावीक वेळ नाही.

Right Time to Eat Walnuts

|

sakal

अक्रोड योग्य पद्धतीने साठवून ठेवा

अक्रोडातील हेल्दी फॅट्स टिकवण्यासाठी ते हवाबंद डब्यात साठवा. जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवणे उत्तम.

Walnuts Storage

|

sakal

जेवणानंतर पोट फुगतंय? गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ ५ सोपे व्यायाम!

Simple Exercises for Bloating

|

sakal

आणखी वाचा