तुपात भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीराला मिळतात दुहेरी फायदे!

Aarti Badade

अक्रोड आणि तुपाचा संगम

रात्रभर पाण्यात भिजवलेले अक्रोड सकाळी साजूक तुपात परतून खाणे हे आरोग्यासाठी एक उत्तम 'सुपरफूड' मानले जाते.

Soaked walnuts with ghee benefits

|

Sakal

तीक्ष्ण बुद्धी आणि स्मरणशक्ती

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि स्मरणशक्ती कमालीची सुधारते.

Soaked walnuts with ghee benefits

|

sakal

हृदयाचे आरोग्य सुधारते

अक्रोड खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढून हृदय मजबूत राहते.

Soaked walnuts with ghee benefits

|

Sakal

पचनक्रिया आणि बद्धकोष्ठता

भिजवलेले अक्रोड पचायला हलके असतात, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा दूर होतो.

Soaked walnuts with ghee benefits

|

sakal

हाडे आणि सांधेदुखीवर प्रभावी

तुपातील स्निग्धता आणि अक्रोडातील कॅल्शियम हाडे मजबूत करतात, ज्यामुळे सांधेदुखीच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

Soaked walnuts with ghee benefits

|

sakal

चमकदार त्वचा आणि निरोगी केस

अक्रोडमधील व्हिटॅमिन ई मुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि केसांचे आरोग्य सुधारून ते दाट होतात.

Soaked walnuts with ghee benefits

|

sakal

वजन आणि भूक नियंत्रण

हे मिश्रण खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते आणि शरीराला दिवसभर काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते.

Soaked walnuts with ghee benefits

|

sakal

सेवनाची योग्य पद्धत

दररोज सकाळी २ ते ४ भिजवलेले अक्रोड तुपासोबत खाणे पुरेसे आहे, जे हिवाळ्यात अधिक फायदेशीर ठरते.

Soaked walnuts with ghee benefits

|

Sakal

हार्ट अटॅकचे कारण कोलेस्ट्रॉल नाही तर 'हे' आहे? शास्त्रज्ञांचा नवा खुलासा!

Heart health and gut bacteria

|

Sakal

येथे क्लिक करा