Aarti Badade
ओमॅड (OMAD), कीटो डायट, वॉटर फास्टिंग, बुलेट कॉफी आणि केवळ ज्यूसवर राहणे, हे सध्याचे काही लोकप्रिय फॅड डायट आहेत. पण हे डायट दीर्घकाळ टिकणारे नाहीत.
Fad Diets side effects
Sakal
ओमॅड म्हणजे 'दिवसातून फक्त एकदाच जेवणे'. लोकांना वाटते यामुळे वजन लगेच कमी होईल, पण हे डायट बंद करताच वजन पुन्हा वेगाने वाढू लागते.
Fad Diets side effects
Sakal
कीटो डायटमध्ये फॅट जास्त आणि कार्बोहायड्रेट्स अत्यंत कमी असतात. मुळात हे डायट मेंदूचे विकार असलेल्या रुग्णांसाठी सुरू झाले होते, पण आता सर्रास सर्वच जण ते करत आहेत जे चुकीचे आहे.
Fad Diets side effects
sakal
केवळ एकच प्रकारचा आहार घेतल्याने शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे मिळत नाहीत. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन अशक्तपणा येतो.
Fad Diets side effects
sakal
डायट तुम्ही आयुष्यभर सहजपणे पाळू शकत नाही, ते तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते. तात्पुरता फरक दिसला तरी नंतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
Fad Diets side effects
Sakal
काही लोक फक्त सॅलड खातात किंवा ज्यूस पितात. यामुळे सुरुवातीला वजन कमी झाल्यासारखे वाटते, पण शरीराला संतुलित आहार न मिळाल्यास चयापचय क्रिया बिघडते.
Fad Diets side effects
Sakal
प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे कोणाचेही ऐकून डायट सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ आहारतज्ज्ञांचा (Nutritionist) सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Fad Diets side effects
Sakal
निरोगी राहण्यासाठी आहारात प्रथिने, कर्बोदके, फॅट्स आणि जीवनसत्त्वे यांचा योग्य समतोल असावा. 'क्रॅश डायट' पेक्षा घरचा सकस आहार कधीही उत्तम!
Fad Diets side effects
sakal
वजन कमी करणे हा एक प्रवास आहे, शर्यत नाही. शरीराला उपाशी ठेवून नाही, तर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाऊनच तुम्ही कायमस्वरूपी फिट राहू शकता.
Fad Diets side effects
Sakal
Hernia Symptoms
Sakal