Apurva Kulkarni
सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू वालावलकर अखेर लग्नबंधनात अडकली आहे. कुणाल भगतसोबत तिने लग्नगाठ बांधलीय.
अंकिताने लग्नासाठी पिवळी साडी नेसली होती. तर कुणालने अंकिताला मॅचिंग धोती-कुर्ता परिधान केला होता.
अंकिताचं सनई-चौघडे अन् तुतारीच्या स्वरांनी राजेशाही थाटात स्वागत करण्यात आलं.
अंकिताने फोटो पोस्ट करत छान कॅप्शनही दिलं आहे, तिने लिहिलं की, 'वालावलकरांचे थोरलो जावई... मला बायको केल्याबद्दल नवरा कुणाल भगतचं अभिनंदन.'
अंकिताच्या लग्नात नितेश राणे यांनी देखील उपस्थित होते. त्यांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
अंकिता-कुणालच्या लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांनी कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलं आहे. दोघेही खूप खूश दिसत आहे.
सोशल मीडियावर अंकिताने लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर तिने फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.