Saisimran Ghashi
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील सोडियम लवकर कमी होते, त्यामुळे धोका वाढतो.
सोडियमची कमतरता झाल्यास अचानक बेशुद्ध होण्याचा धोका असतो.
ही कमतरता हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयाशी संबंधित आजार निर्माण करू शकते.
शरीरातील पाणी आणि द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यासाठी सोडियम आवश्यक असते.
जास्त पाणी प्यायल्यानेही शरीरातून सोडियम कमी होऊ शकतो.
उलट्या, अतिसार, हृदय-यकृत विकार आणि औषधांमुळेही सोडियम कमी होतो.
लक्षणांमध्ये मळमळ, चक्कर, डोकेदुखी, चिडचिड आणि स्नायूंमध्ये कमकुवतपणा दिसतो.
रक्तातील सोडियमची योग्य पातळी १३५ ते १४५ mEq/L दरम्यान असावी.
दररोज ५ ग्रॅम मीठ घेतल्यास आवश्यक २ ग्रॅम सोडियम शरीरात मिळते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.