Aarti Badade
दही वडा हा केवळ सणासुदीलाच नाही, तर कधीही खाण्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे. मऊ वडा आणि त्यावर थंडगार चटपटीत दही... ही चवच काही न्यारी असते!
Soft Dahi Vada Secret
Sakal
उडीद डाळ ४-५ तास भिजवून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून मिक्सरमध्ये अगदी कमी पाणी घालून डाळ बारीक वाटून घ्यावी.
Soft Dahi Vada Secret
Sakal
वाटलेले पीठ एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ घाला. आता हे पीठ ५-७ मिनिटे एकाच दिशेने चांगले फेटा, जेणेकरून पीठ हलके आणि फुलके होईल. यामुळे वडे आतून मऊ होतात.
Soft Dahi Vada Secret
Sakal
कढईत तेल गरम करा. हात ओला करून पिठाचे छोटे वडे तेलात सोडा. मध्यम आचेवर वडे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
Soft Dahi Vada Secret
Sakal
वडे थेट कोमट पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे वड्यांमधील जास्तीचे तेल निघून जाते आणि ते अधिक मऊ होतात. १० मिनिटांनंतर हाताने हलके दाबून त्यातील पाणी काढून घ्या.
Soft Dahi Vada Secret
Sakal
एका भांड्यात दही घेऊन ते चांगले फेटून घ्या. त्यात थोडे मीठ आणि चवीनुसार साखर (ऐच्छिक) घालून एकजीव करा. लक्षात ठेवा, दही ताजे आणि थंड असावे.
Soft Dahi Vada Secret
Sakal
एका प्लेटमध्ये भिजवलेले वडे ठेवा. त्यावर फेटलेले भरपूर दही घाला. त्यानंतर वरून चिंचेची गोड चटणी आणि हिरवी तिखट चटणी पसरवा.
Soft Dahi Vada Secret
Sakal
शेवटी त्यावर जिरे पूड, लाल तिखट आणि काळं मीठ भुरभुरा. आवडीनुसार शेव किंवा कोथिंबीर घालून गरमागरम किंवा थंडगार सर्व्ह करा!
Soft Dahi Vada Secret
Sakal
Kaju Curry recipe
sakal