Aarti Badade
मऊसूत आणि चविष्ट ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी नेहमी ताजे, बारीक आणि चक्कीतून दळलेले ज्वारीचे पीठ वापरा.
Soft Jowar Bhakri
Sakal
ज्वारीचे पीठ मळताना कोमट किंवा हलके गरम पाणी वापरा, यामुळे पीठ मळणे सोपे होते आणि भाकरी मऊ होण्यास मदत होते.
Soft Jowar Bhakri
sakal
पीठ थोडे थोडे घालून हाताच्या तळव्याने चांगले मळून घ्या, जेणेकरून कणिक मऊ आणि एकजीव होईल.
Soft Jowar Bhakri
esakal
भाकरी थापताना किंवा लाटताना जास्त सुके पीठ वापरू नका, कारण त्यामुळे भाकरी कोरडी आणि कडक होऊ शकते.
Soft Jowar Bhakri
Sakal
भाकरी भाजण्यापूर्वी तवा पुरेसा गरम करून घ्या, त्यामुळे भाकरी व्यवस्थित भाजण्यास आणि फुगण्यास मदत होते.
Soft Jowar Bhakri
sakal
तव्यावर भाकरी टाकल्यानंतर तिच्या वरच्या बाजूला थोडे पाणी लावा आणि संपूर्ण पृष्ठभाग ओलसर करून घ्या.
Soft Jowar Bhakri
sakal
भाकरीची एक बाजू भाजल्यानंतर ती उलटून दुसरी बाजू शेकून घ्या आणि शेवटी चिमट्याने किंवा उलथण्याने थेट गॅसच्या आचेवर दोन्ही बाजूंनी फुलवा.
Soft Jowar Bhakri