Apurva Kulkarni
अभिनेत्री सोहा अली खानचा छोरी 2 चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉनवर रिलीज झाला.
या चित्रपटात सोहा अली खान खलनायिकेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात सोहाचा खतरनाक लूक चाहत्यांना पहायला मिळाला आहे.
या छोरी 2 चित्रपटात सोहा एका चेटकिनीची भुमिका साकारली आहे.
तिचा भयावह लूक पाहून चाहत्यांना सुद्धा भिती वाटतेय.
जेव्हा सोहा चित्रपटाची शुटिंग करत होती त्यावेळी तिचे पति कुणाल खेमू सुद्धा तिला पाहून घाबरले होते.
दरम्यान सोहाने सांगितलं की, 'शुटिंगवेळी ती मुलीला कधीच व्हिडिओ कॉलवर बोलली नाही. कुणाल सुद्धा तिला दोन महिना बोलला नव्हता असं तिने सांगितलं.'
या चित्रपटात सोहा 'दासी माँ' च्या भूमिकेत पाहायला मिळाली आहे.
हा चित्रपटाला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून छोरी 2 ला चांगले रिव्ह्यू सुद्धा दिसत आहे.