सकाळ डिजिटल टीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सोलापूरशी घट्ट नातं आहे. बाबासाहेबांच्या अनेक अविस्मरणीय आठवणी आजही सोलापूरकरांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत. अशाच आठवणींपैकी एक महत्त्वाची आठवण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावाने आजही जपून ठेवली आहे.
Dr. Babasaheb Ambedkar visit Solapur
esakal
24 जानेवारी 1937 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार जिवाप्पा ऐदाळे यांच्या प्रचारासाठी बाबासाहेब मंद्रूपमध्ये आले होते. येथील समाज मंदिरात त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
Dr. Babasaheb Ambedkar visit Solapur
esakal
या सभेसाठी समाजमंदिरासमोर विशेष ठिकाणी ठेवलेला एक दगड, ज्यावर पाय ठेवून बाबासाहेब सभागृहात प्रवेशले, तो आजही गावकऱ्यांनी तितक्याच आदराने जतन केले आहे.
Dr. Babasaheb Ambedkar visit Solapur
esakal
1937 च्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाकडून जिवाप्पा ऐदाळे हे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी बाबासाहेब 24 मार्च 1937 रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात मंद्रूपमधील भीमनगर येथील नव्या समाज मंदिरात त्यांची सभा झाली.
Dr. Babasaheb Ambedkar visit Solapur
esakal
त्या काळात गावातील एका विहिरीजवळून मोठा दगड आणून मंदिरासमोर ठेवण्यात आला होता. त्या दगडावर पाय ठेवूनच बाबासाहेब समाज मंदिरात आले आणि सुमारे पाच मिनिटांच्या सभेत नागरिकांना मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी ऐदाळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
Dr. Babasaheb Ambedkar visit Solapur
esakal
बाबासाहेब मंद्रूपला येणार असल्याचे कळताच देशम्हेत्रे, गंगाप्पा रणखांबे, श्रीमंत देशमुख, पांढरे यांसारखे तेव्हाचे गावातील पुढारी तसेच शेकडो नागरिक सकाळी ७ वाजता त्यांच्या स्वागतासाठी जमा झाले. मंद्रूप चौकातून भीमनगरपर्यंत बाबासाहेब पायी चालत आले आणि लोकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
Dr. Babasaheb Ambedkar visit Solapur
esakal
बाबासाहेबांनी पाय ठेवलेला तो दगड आजही समाज मंदिरात जतन करून ठेवलेला आहे. या दगडामुळे बाबासाहेब या भूमीत आले होते, या अभिमानाची भावना गावकऱ्यांच्या मनात आजही जिवंत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मिळून ही वास्तू आणि दगड यांचे संरक्षण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
Dr. Babasaheb Ambedkar visit Solapur
esakal