Monika Shinde
शहरात हिवाळ्याची थंडी सुरु होतेय आणि नागरिक उबदार कपड्यांसाठी बाजारात धाव घेत आहेत. जॅकेट, स्वेटर, मफलरसाठी गर्दी वाढली आहे
सिद्धेश्वर मंदिर परिसरातील हिवाळी स्टॉल्स रंगीबेरंगी जॅकेट, स्वेटर आणि शाल्यांनी सजले आहेत. ग्राहक उत्सुकतेने खरेदी करत आहेत.
स्टॉल्सवर वेगवेगळ्या रंग, डिझाईन्स आणि आकारातील वस्त्रांची प्रदर्शने आहेत. लोक थंडीतही स्टाइलिश राहण्यासाठी खरेदी करत आहेत.
स्वेटर आणि जॅकेट सर्व वयोगटात लोकप्रिय आहेत. थंडीपासून संरक्षण आणि उबदार राहण्यासाठी हे आवश्यक आहेत.
शाळकरी मुले, विद्यार्थी आणि कामकाजी लोक बाजारात मोठ्या संख्येने दिसत आहेत. प्रत्येकाला गरजेप्रमाणे वस्त्रं निवडायची आहेत.
विक्रेते दिवसभर ग्राहकांच्या गर्दीला सामोरे जात आहेत. हिवाळ्यामुळे गरम कपड्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे.
मफलर, टोपी, शाल आणि इतर छोट्या वस्त्रांवर ग्राहकांची नजर आहे. थंडीपासून बचावासाठी हे अत्यंत उपयोगी ठरत आहेत.