Monika Shinde
पावसाळा सुरू झाला की गरमागरम आणि चमचमीत काहीतरी खाण्याची इच्छा होतेच.
बाहेर जाऊन खाण्याऐवजी, घरच्या घरीच सोलापूरची प्रसिद्ध डिस्को भजी बनवून पावसाळ्याचा आनंद द्विगुणित करा
सोलापूरमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या या मिरचीच्या भजीची चव खूपच वेगळी आणि खास असते. चला तर मग, जाणून घेऊया ही कुरकुरीत आणि चवदार भजी घरी कशी बनवायची.
सोलापूर डिस्को भजी ही एक खास प्रकारची मिरचीची भजी आहे.
हिरव्या मिरच्या, बेसन,ओवा, चवी नुसार मीठ, टाळण्यासाठी तेल आणि कढई
सर्वप्रथम, बेसन, ओवा आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ (घोल/बॅटर) तयार करा. पीठ जास्त पातळ नसावे.
आता हिरव्या मिरच्यांना मधोमध लांब चिरून घ्या (पूर्णपणे दोन भाग करू नका, एक बाजू जोडलेली राहू द्या). नंतर एका बाजूला गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा.
तेल गरम झाल्यावर, तयार केलेल्या पिठाच्या मिश्रणात हिरव्या मिरच्या बुडवा. त्या गरम तेलात सोडा आणि मंद आचेवर (हलक्या सोनेरी रंगावर) तळून घ्या. यावेळी भजी पूर्ण कडक करायची नाही, फक्त अर्धवट तळायची आहे. सर्व भजी तळून झाल्यावर थंड होऊ द्या.
थंड झालेल्या सर्व भजीचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. आता कढईतील तेल पुन्हा चांगले गरम करा. तयार केलेले छोटे तुकडे गरम तेलात सोडा आणि कडक व कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या. यामुळेच त्यांना 'डिस्को भजी'चा कुरकुरीतपणा मिळतो.