Varsha Balhe
हो, घराच्या छतावर लावलेल्या सोलर पॅनेलमधून तयार झालेल्या विजेचा वापर EV चार्ज करण्यासाठी करता येतो. म्हणजे गाडी चार्ज करण्यासाठी घरच्या सोलर विजेचा वापर करता येतो.
CAN EV BE CHARGED USING SOLAR PANELS AT HOME
esakal
दिवसा Solar Panelमधून वीज तयार होते. ही वीज घरातील उपकरणांसोबत EV चार्ज करण्यासाठीही वापरता येते. त्यामुळे गाडी चार्ज करण्यासाठी ग्रिडमधून घ्यावी लागणारी वीज कमी होऊ शकते.
CAN EV BE CHARGED USING SOLAR PANELS AT HOME
esakal
दिवसा तयार झालेली सगळी सोलर वीज लगेच वापरणं शक्य नसेल, तर ग्रिड-कनेक्टेड सिस्टममध्ये अतिरिक्त वीज ग्रिडकडे जाऊ शकते. महाराष्ट्रात रूफटॉप सोलरसाठी नेट-मीटरिंग आणि नेट-बिलिंगच्या व्यवस्था उपलब्ध आहेत.
CAN EV BE CHARGED USING SOLAR PANELS AT HOME
esakal
हे EVची बॅटरी, दर महिन्याला किती किलोमीटर गाडी चालवता आणि घराचा वीज वापर यावर अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्येकासाठी 5 किंवा 8 kW सोलर सिस्टमच लागतो, असं ठरलेलं नाही.
CAN EV BE CHARGED USING SOLAR PANELS AT HOME
esakal
समजा EV दर महिन्याला 1000 किलोमीटर चालते आणि तिचा वीज वापर साधारण 0.15 युनिट प्रति किलोमीटर आहे. तर महिन्याला जवळपास 150 युनिट वीज लागेल. ही वीज सोलरमधून मिळाली तर EV चार्जिंगसाठी ग्रिडमधून घ्यावी लागणारी वीज मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
CAN EV BE CHARGED USING SOLAR PANELS AT HOME
esakal
उदाहरण म्हणून 150 युनिट वीज आणि ₹8 प्रति युनिट दर धरला, तर ग्रिडमधून चार्जिंगचा खर्च सुमारे ₹1,200 प्रति महिना होऊ शकतो. सोलरमधून हीच वीज मिळाल्यास EV चार्जिंगचा अतिरिक्त वीजखर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र प्रत्यक्ष बचत तुमचा वीज दर, सोलर सिस्टम, चार्जिंगची वेळ आणि वापरावर अवलंबून असेल.
CAN EV BE CHARGED USING SOLAR PANELS AT HOME
esakal
हो, पण सोलर पॅनेल बसवल्यानंतर गाडी कायमच मोफत चार्ज होते, असं म्हणता येणार नाही. सोलर सिस्टमची किंमत, देखभाल, चार्जर, घराचा वीज वापर आणि net-meteringचा हिशोबही महत्त्वाचा आहे.
CAN EV BE CHARGED USING SOLAR PANELS AT HOME
esakal
EV BATTERY
esakal