Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये झहीर सोनाक्षीला समुद्राच्या पाण्यात जोरात ढकलताना दिसून येत आहे.
त्यावेळी सोनाक्षीच्या नाकातोंडात पाणी जातं आणि उठण्याचा प्रयत्न करत असतानाही पुन्हा एका लाटेने ती खाली पडते.
हे पाहून झहीर आणखी जोरजोरात हसू लागतो. अखेर सोनाक्षी उठून झहीरला मागे धावते.
या व्हिडीओला तिने कॅप्शन दिलंय ‘शांतीने एक व्हिडीओसुद्धा बनवू देत नाही हा मुलगा..’ यासोबतच तिने रागाचे इमोजी पोस्ट केले आहेत.
सोनाक्षी आणि झहीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्नगाठ बांधली.