Payal Naik
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा प्रेक्षकांचा लाडका दबंग खान आहे.
सलमानचे गेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले असले तरी त्याच्या चाहत्यांची संख्या मुळीच कमी झालेली नाही.
सलमानच्या चित्रपटांइतकच त्याचं वैयक्तिक आयुष्यदेखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतं.
सलमान खानच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या घराबद्दलही चाहत्यांमध्ये कायम चर्चा होत असते.
सलमानच्या घराला कधीही कुलूप नसतं. यामागचं कारण अभिनेता सुरज पांचोली यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
सुरज म्हणाला, सलमान खानचा स्वभाव खूप दयाळू आहे. त्यामुळेच इंडस्ट्रीमध्ये त्याला मान दिला जातो.
तो एक दिलखुलास व्यक्ती आहे. इतरांना मदत करण्यासाठी तो नेहमीच तयार असतो.
त्यामुळेच सलमानच्या घराचं दार कधीच बंद नसतं. ते नेहमीच सगळ्यांसाठी उघडं असतं.
त्याचं गॅलेक्सी अपार्टमेंट इथलं घर नेहमी उघडं असायचं, दाराला कुलूप, टाळा वापरण्याची कधी वेळच आली नाही.
पाहुण्यांसाठीचं जेवण त्यांच्या घरात तयारच असतं. त्यांचा फ्रिज उघडून काही घ्यायचं असेल, तर तुम्हाला कोणीही थांबवत नाही.
सलमान खान कधीच कोणालाही परकं वाटू देत नाही. त्याचे घर खरंच खूप लहान आहे. पण माणूसकीनं भरलेलं आहे
२४ वर्षाच्या रिंकू राजगुरूची संपत्ती किती? वाचून भुवया उंचावतील