Pranali Kodre
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने १४ जून रोजी इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.
लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला ५ विकेट्सने मात दिली.
या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी सलामीवीर फलंदाज एडेन मार्करम ठरला. त्याने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
अंतिम सामन्यात चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर २८२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना ३० वर्षीय मार्करमने कर्णधार टेम्बा बावूमासोबत १४७ धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
तसेच त्याने २०७ चेंडूत १४ चौकारांसह १३६ धावांची खेळी केली.
मार्करमने गोलंदाजी करताना पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथला आणि दुसऱ्या डावात जोश हेझलवूडलाही बाद केले होते.