एकदा चाखाच! दक्षिण भारताचे 9 खवय्यांना भुरळ घालणारे नाश्ते

Monika Shinde

इडली

तांदळाच्या आणि उडीद डाळीच्या पीठापासून बनवलेली, वाफेवर शिजवलेली ही हलकीफुलकी इडली सांबर आणि नारळाच्या चटणीसोबत अप्रतिम लागते.

वडा

उडीद डाळीपासून बनवलेला हा खमंग वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतो. सांबर आणि नारळाच्या चटणीसोबत मस्त लागतो.

म्हैसूर बोंडा

उडीद डाळ आणि मसाल्यांचे मिश्रण तळून बनवलेला हा गोलसर बोंडा चवीलाही भारी असतो. आणि नारळाच्या चटणीसोबत खाल्ल्यास त्याची चव अविस्मरणीय ठरते.

अप्पम

तांदळाच्या पिठापासून बनवलेला, कडांपासून पातळ आणि मधोमध थोडासा जाडसर असलेला हा गोलसर नाश्ता केरळमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

इडियप्पम

तांदळाच्या पिठापासून तयार केलेले, पातळ सुतांसारखे दिसणारे इडियप्पम हे केरळ आणि तामिळनाडूमधील खास नाश्त्याचे रूप आहे. हे अनेकदा स्ट्यू किंवा खोबरं-गूळ यांच्यासोबत खाल्ले जाते.

डोसा

तांदळाच्या आणि डाळीच्या पिठाचा पातळ, कुरकुरीत आणि गोलसर डोसा ही एक प्रसिद्ध डिश आहे. नारळाची चटणी, लाल चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसह खाल्ला जातो.

उत्तप्पा

उत्तप्पा हा डोशाच्या पिठाचा जाडसर, थोडा नरमसर प्रकार आहे ज्यात कांदा, टोमॅटो इ. भाज्यांचा वापर केला जातो. सांबर आणि चटणीसोबत उत्तम लागतो.

पोंगल

तांदूळ आणि मूगडाळीपासून बनवलेले पोंगल हे खास तामिळनाडूतील लोकप्रिय नाश्त्याचे पक्वान्न आहे. तूप, मिरी, कढीपत्ता यांचा वापर याला खास चव देतो.

फिल्टर कॉफी

फिल्टर कॉफी हा दक्षिण भारताचा खास पेय. गरम दूध, सुगंधी डेकोक्शन आणि साखरेचा सुंदर संगम. स्टीलच्या डाबऱ्यातून दिली जाणारी ही कॉफी एकदा नक्कीच चाखा!

दररोज ४०–४५ मिनिटं चालण्याचे आरोग्यदायी फायदे

येथे क्लिक करा