दक्षिण कोरियाच्या कृत्रिम सूर्याने रचला इतिहास; खऱ्या सूर्यापेक्षा जास्त तापमान गाठलं

Sudesh

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी एक मोठी कामगिरी करून दाखवली आहे.

Artificial Sun | eSakal

कृत्रिम सूर्य

या वैज्ञानिकांनी न्यूक्लिअर फ्यूजन टेक्नॉलॉजी वापरुन एक कृत्रिम सूर्य तयार केला होता.

Artificial Sun | eSakal

तापमान

या सूर्याने आता सर्वाधिक काळ 10 कोटी डिग्री सेल्सिअस एवढं उच्च तापमान कायम ठेवण्याचा विश्वविक्रम केला आहे.

Artificial Sun | eSakal

सूर्य

हे तापमान आपल्या सूर्याच्या कोअरपेक्षा सात पटींनी अधिक असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.

Artificial Sun | eSakal

48 सेकंद

न्यूक्लिअर फ्युजनमध्ये तब्बल 48 सेकंदांपर्यंत हे तापमान कायम ठेवण्यात संशोधकांना यश मिळालं.

Artificial Sun | eSakal

उर्जा स्त्रोत

भविष्यात या कृत्रिम सूर्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उर्जा निर्मिती होऊ शकते, हे या संशोधनामुळे सिद्ध झालं आहे. त्यामुळे हे एक मोठं यश मानलं जात आहे.

Artificial Sun | eSakal

उर्जा

यामुळे जगावरचं उर्जेचं संकट संपुष्टात येण्यात मदत होईल. 2026 सालापर्यंत कमीत कमी 300 सेकंदांपर्यंत हे उच्च तापमान कायम ठेवण्याचं वैज्ञानिकांचं लक्ष्य आहे.

Artificial Sun | eSakal

मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला माहिती हवेत 'हे' सीक्रेट कोड; जाणून घ्या

USSD Codes | eSakal