Payal Naik
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय.
अवघ्या ३ दिवसात या चित्रपटाने १५० कोटींची कमाई केलीये.
चित्रपटात दाखवण्यात आलेल्या भव्यदिव्य सीनची सर्वत्र चर्चा आहे.
मात्र या चित्रपटाचं शूटिंग कुठे झालंय हे तुम्हाला ठाऊक आहे का?
भारतातील अनेक ठिकाणांवर या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं असून यात अनेक महाराष्ट्रातील ठिकाणांचा देखील समावेश आहे.
महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं आणि सुंदर ठिकाण असलेल्या वाई शहरात छावा चित्रपटाच्या काही भागांचं शुटिंग झालेलं आहे.
यात मेणवली घाट वाई, धोम धरण यांचा समावेश आहे.
महाबळेश्वर येथेही या चित्रपटाचं चित्रीकरण झालंय. हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या आणि धुक्यांनी झाकलेल्या अनेक टेकड्या तुम्ही छावा या चित्रपटामध्ये पाहू शकता.
पुण्यातही या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. पुण्यातील काही ऐतिहासिक किल्ले आणि शाही राजवाडे तुम्ही छावा चित्रपटामध्ये पाहू शकता
मुंबईतील स्टुडिओमध्येदेखील चित्रपटाचं शूटिंग झालंय.
'छावा' मध्ये कुणी केलीये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? समोर आली मोठी अपडेट