Monika Shinde
यंदा रामनवमी रविवार, ६ एप्रिल ला साजरी केली जाणार आहे. यादिवशी देशातील विविध राममंदिरात विशेष पूजा केली जाते. चला, मग जाणून घेऊया
श्रीराम जन्मभूमी मंदिर हे अयोध्यात आहे. मंदिर फुलांनी सजवले जाते. विशेषतः हे मंदिर रात्री दिव्यांनी सजवले जाते. या मंदिरात भजन कीर्तन, हवन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तेलंगणाच्या भद्रदी कोठागुडेम येथील भद्राचलममध्ये श्रीराम आणि माता सीता यांना समर्पित मंदिर आहे. येथे रामनवमी दिवशी "कल्याणमहोत्सव" म्हणजेच प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा भव्य विवाहसोहळा केला जातो.
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात अत्यंत सुंदर असलेले त्रिप्रायर मंदिर स्थित आहे. असे म्हणतात की हे मंदिर एका मच्छिमाराने स्थापीत केले होते. आणि नंतर शासक वक्कायिल कैमल यांनी या मूर्तीस त्रिप्रायरमध्ये स्थापित केले.
मध्य प्रदेशाच्या ओरछा जिल्ह्यात भगवान रामाचे भव्य मंदिर आहे. हे देशातील एकमेव मंदिर आहे. जिथे श्रीरामांना राजा राम म्हणून संबोधित केले जाते. या मंदिरात दररोज श्रीरामांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो.