उपवासासाठी खास साबुदाणा लाडू: सोपी रेसिपी!

Aarti Badade

उपवासात गोड काहीतरी हवंय?

साबुदाणा लाडू उपवासात खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे! त्यात पारंपरिक चव आणि पौष्टिक घटक आहेत.

Sabudana Ladoo recipe | Sakal

साहित्य काय लागेल?

१ वाटी वाळवलेला साबुदाणा, १ वाटी साखर, अर्धी वाटी लिंबाचा रस, वेलदोडा पूड, बडीशेप काप, केशर आणि तूप घ्या.

Sabudana Ladoo recipe | Sakal

पहिलं पाऊल – साबुदाणा भाजणे

पोहे भाजतो तसा साबुदाणा कोरड्या कढईत भाजून घ्या. तो तांबूस होईपर्यंत भाजा. ही पायरी लाडूंची चव ठरवते!

Sabudana Ladoo recipe | Sakal

साखर पाक कसा कराल?

एका पातेल्यात साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक बनवा. त्यात लिंबाचा रस घाला. यामुळे पाक चांगला टिकतो.

Sabudana Ladoo recipe | Sakal

चवीनुसार मसाला घालणे

पाकात वेलदोड्याची पूड, बडीशेप काप आणि केशर मिसळा. हे मिश्रण लाडूंना सुंदर सुगंध आणि चव देते.

Sabudana Ladoo recipe | Sakal

साबुदाणा आणि पाक एकत्र करा

तयार पाकात भाजलेला साबुदाणा मिसळा. सर्व साहित्य नीट मिसळून एक गोळा तयार करा.

Sabudana Ladoo recipe | Sakal

गोळे बनवण्याची वेळ!

हलक्या हाताने लाडवांसारखे गोळे वळा. लाडू थोडा गरम असतानाच वळल्यास ते चांगले बनतात.

Sabudana Ladoo recipe | Sakal

टीप – तूप घालायचं का?

जर लाडू कोरडे वाटले, तर थोडं तूप मिसळा. त्यामुळे लाडू मऊ आणि चमकदार होतील.

Sabudana Ladoo recipe | Sakal

लाडू बनवताना काय टाळाल?

पाक जर जास्त झाला तर लाडू चिकट होतात. त्यामुळे नेहमी एकतारी पाकच वापरा!

Sabudana Ladoo recipe | Sakal

टोमॅटो खा अन् 6 समस्यांपासून व्हा दूर!

tomato health benefits | Sakal
येथे क्लिक करा