सकाळ डिजिटल टीम
सैनिकी सेवा पूर्व शिक्षण (एसपीआय) संस्थेच्या ४९ व्या तुकडीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
२० एप्रिल २०२५ रोजी लेखी परीक्षा होईल. अंतिम अर्ज सादरीकरणाची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.
परीक्षा शुल्क ४५० रुपये असून, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे शुल्क भरण्याची व्यवस्था आहे.
मुलांसाठी www.spiaurangabad.com आणि मुलींसाठी www.girlspinashik.com या वेबसाइटवर अर्ज करता येईल.
लेखी परीक्षा ८ ठिकाणी (मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर) घेण्यात येईल.
लेखी परीक्षेत गणित, सामान्यज्ञान आणि सर्वसामान्य क्षमता चाचणीचे प्रश्न असतील. ६०० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील.
लेखी परीक्षेनंतर मे २०२५ मध्ये मुलाखती घेतल्या जातील. ३०० मुलांची मुलाखत घेऊन ६० मुलांची निवड केली जाईल.
विद्यार्थी २ जानेवारी २००८ ते १ जानेवारी २०११ या कालावधीत जन्मलेले असावे. विद्यार्थी अकरावीला पात्र असावेत आणि सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी योग्य असावे.