चिकनप्रेमींसाठी खास! असा बनवा तोंडाला पाणी आणणारा चिकन रान

Aarti Badade

मसालेदार आणि रसाळ चिकन रान!

दही, मसाले आणि आले-लसूण पेस्टमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन रान प्रत्येक घासात देईल जबरदस्त चव.

Chicken Raan Recipe

|

Sakal

लागणारे साहित्य

१ अखंड चिकन रान, ३-४ चमचे घट्ट दही, १ चमचा आले-लसूण पेस्ट, २ चमचे लाल तिखट, १ चमचा हळद, २ चमचे गरम मसाला, धने-जिरे पूड, लिंबाचा रस, मीठ आणि तेल घ्या.

Chicken Raan Recipe

|

Sakal

चिकनला चिरा द्या

चिकन रान स्वच्छ धुऊन घ्या आणि मसाला आतपर्यंत मुरण्यासाठी त्यावर सुरीने हलके चिरा द्या.

Chicken Raan Recipe

|

Sakal

मसाला तयार करा

एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने-जिरे पूड आणि मीठ एकत्र करून मॅरिनेड तयार करा.

Chicken Raan Recipe

|

Sakal

चिकन मॅरिनेट करा

तयार मसाला चिकन रानाला सर्व बाजूंनी आणि चिरलेल्या भागांमध्ये व्यवस्थित चोळून लावा.यानंतर चिकन २ ते ४ तास फ्रिजमध्ये मुरू द्या.

Chicken Raan Recipe

|

Sakal

चिकन रान शिजवा

कढईत तेल किंवा बटर गरम करून मॅरिनेट केलेलं चिकन रान ठेवा आणि झाकण ठेवून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्या.

Chicken Raan Recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

चिकन रान चांगलं शिजून सोनेरी रंगाचं झालं की वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला.गरमागरम चिकन रान चपाती, भाकरी किंवा सलाडसोबत सर्व्ह करा!

Chicken Raan Recipe

|

Sakal

१५ मिनिटांत मॅरीनेट, तव्यावर झटपट फ्राय; अशी बनवा कोळंबी

Crispy Malvani Prawn Fry

|

Sakal

येथे क्लिक करा