तडका गावरान चवीचा! सुट्ट्यांमध्ये बनवा झणझणीत 'खर्डा चिकन'

Aarti Badade

झणझणीत मांसाहारी बेत

लाल तिखटा ऐवजी प्रामुख्याने फक्त तिखट हिरव्या मिरचीचा (ठेचा किंवा खर्डा) वापर करून बनवले जाणारे 'खर्डा चिकन' हा महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय गावरान बेत आहे.

Spicy Green Chilli Kharda Chicken Recipe

|

Sakal

खर्डा चिकन बनवण्यासाठी साहित्य

यासाठी ५०० ग्रॅम स्वच्छ धुतलेले चिकन, १०-१२ तिखट हिरव्या मिरच्या, १५-१६ लसूण पाकळ्या, २ बारीक चिरलेले कांदे, आलं-लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घ्या.

Spicy Green Chilli Kharda Chicken Recipe

|

Sakal

इतर आवश्यक मसाले

यासोबतच फोडणीसाठी आणि गार्निशिंगसाठी आवश्यकतेनुसार तेल, अर्धा चमचा हळद, एक चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर गोळा करा.

Spicy Green Chilli Kharda Chicken Recipe

|

Sakal

चिकनचे मऊ आणि चवदार मॅरिनेशन

सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या चिकनला हळद, मीठ, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस व्यवस्थित लावून १५ ते २० मिनिटे बाजूला (Marinate) ठेवून द्या.

Spicy Green Chilli Kharda Chicken Recipe

|

Sakal

पॅन

एका पॅनमध्ये थोडे तेल घालून हिरव्या मिरच्या आणि लसूण चांगला परतून घ्या, त्यानंतर हे मिश्रण खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर (Coarse) वाटून घ्या.

Spicy Green Chilli Kharda Chicken Recipe

|

Sakal

कढईमध्ये कांदा आणि मसाल्यांची फोडणी

कढईत तेल गरम करून कढीपत्ता आणि कांदा सोनेरी रंगावर परता; नंतर त्यात तयार केलेला जाडसर खर्डा (हिरवा मसाला) व आलं-लसूण पेस्ट घालून १ मिनिट चांगले परतून घ्या.

Spicy Green Chilli Kharda Chicken Recipe

|

Sakal

चिकन एकत्र करून मंद आचेवर शिजवणे

आता मॅरिनेट केलेले चिकन या मसाल्यात टाकून मिक्स करा, वरून गरम मसाला व कोथिंबीर घाला आणि चिकन स्वतःचे पाणी सोडेपर्यंत मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्या.

Spicy Green Chilli Kharda Chicken Recipe

|

Sakal

भाकरीसोबत

चिकन पूर्ण शिजल्यावर वरून कोथिंबीर पेरा; तयार झालेले गरमागरम झणझणीत खर्डा चिकन चुलीवरील ज्वारीची भाकरी, चपाती किंवा मऊ तांदळाच्या भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते.

Spicy Green Chilli Kharda Chicken Recipe

|

Sakal

फिश खाताना सोबत कांदा खावा की नाही? नक्की वाचा काय सांगते विज्ञान!

Fish and Onion Combination

|

Sakal

येथे क्लिक करा