Aarti Badade
गावरान चवीचा तिखटजाळ मटण खरडा! हिरवी मिरची आणि लसणाच्या ठेच्यामुळे या सुका मटणाला मिळते भन्नाट चव.
Spicy Mutton Kharda at Home
Sakal
५०० ग्रॅम मटण, १५-२० हिरव्या मिरच्या, १५-२० लसूण पाकळ्या, २ कांदे, १ चमचा आले-लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि ३-४ चमचे तेल घ्या.
Spicy Mutton Kharda at Home
Sakal
कुकरमध्ये तेल गरम करून कांदा आणि आले-लसूण पेस्ट परता, त्यात मटण, हळद व मीठ घालून थोडे पाणी टाका आणि मटण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
Spicy Mutton Kharda at Home
Sakal
पॅनमध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण हलके भाजून घ्या आणि त्याचा जाडसर ठेचा तयार करा. याच हिरव्या खरड्यामुळे मटणाला खास गावरान चव मिळते.
Spicy Mutton Kharda at Home
Sakal
कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यात तयार केलेला हिरवा खरडा घालून काही वेळ चांगला परतून घ्या.
Spicy Mutton Kharda at Home
Sakal
आता शिजवलेले मटण घालून खरड्यासोबत व्यवस्थित मिसळा आणि मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परता. गरज असल्यास थोडासा मटणाचा स्टॉक घालू शकता.
Spicy Mutton Kharda at Home
Sakal
वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून झणझणीत मटण खरडा तयार! बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा चपातीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
Spicy Mutton Kharda at Home
Sakal
Crispy Malvani Prawn Fry
Sakal