हिवाळा स्पेशल चवदार रेसिपी! तोंडाची चव वाढवणारी चटपटीत पेरूची चटणी

Aarti Badade

हिवाळ्याची खास मेजवानी

हिवाळ्यात ताजे आणि गोड पेरू बाजारात येतात. केवळ सॅलड म्हणून खाण्याऐवजी, या पेरूपासून बनवलेली मसालेदार चटणी जेवणाची लज्जत वाढवते.

Spicy peru Guava Chutney

|

Sakal

आवश्यक साहित्य

१ मध्यम पेरू, १ तुकडा आले, २-३ हिरव्या मिरच्या, २ सुक्या लाल मिरच्या, १/२ कप कोथिंबीर, १/२ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून काळे मीठ, साधे मीठ (चवीनुसार), १ इंच गुळाचा तुकडा, १/२ लिंबाचा रस.

Spicy peru Guava Chutney

|

Sakal

पूर्वतयारी

सर्वात आधी पेरू स्वच्छ धुवून त्याचे मध्यम तुकडे करून घ्या. तसेच आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून चिरून घ्या.

Spicy peru Guava Chutney

|

Sakal

मिक्सरचा वापर

मिक्सरच्या जारमध्ये चिरलेला पेरू, कोथिंबीर, आले, हिरवी व लाल मिरची, गूळ, जिरे आणि दोन्ही प्रकारचे मीठ एकत्र करा.

Spicy peru Guava Chutney

|

Sakal

चटणीची कन्सिस्टन्सी

आता यात लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण बारीक वाटून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास चटणी एकदम स्मूद करा किंवा थोडी जाडसर (Coarse) ठेवा.

Spicy peru Guava Chutney

|

Sakal

कशासोबत खावी?

ही चटपटीत पेरूची चटणी तुम्ही सँडविच, गरम पकोडे, पराठा किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी वापरू शकता.

Spicy peru Guava Chutney

|

Sakal

आरोग्यासाठी फायदेशीर

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ही चटणी पचनासाठी उत्तम असून प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Spicy peru Guava Chutney

|

Sakal

भारतातील एकमेव नदी विरुद्ध दिशेने वाहते? जाणून घ्या पौराणिक कथा

Narmada River Facts

|

Sakal

येथे क्लिक करा