पातळ धागा, पण लोखंडी सळ्यांपेक्षाही स्ट्राँग! कोळ्याचे जाळे किती मजबूत असते? जाणून घ्या

Mansi Khambe

कोळ्याचे जाळे

कोळ्याचे जाळे अतिशय पातळ आणि सहज तुटणारे असते. या जाळ्याची तुलना एखाद्या पातळ धाग्याशी केली जाते. मात्र शास्त्रज्ञांनी कोळ्याच्या जाळ्याच्या वैशिष्ट्यामागील रहस्य उलगडले आहे.

Spider web strength

|

ESakal

स्टीलच्या तारा

कोळ्याचे जाळे अनेक प्रकारच्या स्टीलच्या तारांशी स्पर्धा करू शकतो. म्हणजेच ओढल्यावर तुटण्यापूर्वी कोळ्याची जाळी अनेक प्रकारच्या स्टीलपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त दाब सहन करू शकतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Spider web strength

|

ESakal

ताणशक्ती

कोळ्याच्या जाळ्याची ताणशक्ती अंदाजे १,२०० मेगापास्कल्स (MPa) असते. सामान्य स्टीलच्या तुलनेत, त्याची ताकद सुमारे ४०० MPa असल्याचा अंदाज आहे.

Spider web strength

|

ESakal

नैसर्गिक पदार्थ

कोळ्याचा धागा हा त्याच्या वजनाच्या तुलनेत सर्वात मजबूत नैसर्गिक पदार्थांपैकी एक आणि स्टीलपेक्षा जास्त लवचिक आहे. हा धागा तुटण्यापूर्वी त्याच्या मूळ लांबीच्या जवळजवळ दुप्पट ताणला जाऊ शकतो.

Spider web strength

|

ESakal

धाग्याला ताकद कशी मिळते?

शास्त्रज्ञांच्या मते, कोळ्याचा धागा प्रामुख्याने प्रथिनांनी बनलेला असतो. ही प्रथिने अमिनो ॲसिडच्या लांब साखळ्या असतात.

Spider web strength

|

ESakal

अमिनो ॲसिड

तर काही विशिष्ट अमिनो ॲसिड लहान 'चिकटण्याच्या बिंदूं'प्रमाणे एकमेकांना जोडलेले असतात.

Spider web strength

|

ESakal

द्रव रेशीम

कोळ्याच्या शरीरात रेशीम सुरुवातीला 'सिल्क डोप' नावाच्या एका दाट द्रव स्वरूपात असतात. कोळी हा द्रव आपल्या शरीरातून बाहेर टाकतो आणि जाळे विणायला सुरुवात करतो.

Spider web strength

|

ESakal

गुणधर्म

कोळ्याचे रेशीम नैसर्गिक जगातील सर्वात अद्वितीय पदार्थांपैकी एक मानले जाते. त्याच्या गुणधर्मांची तुलना अनेकदा स्टील आणि केव्हलारसारख्या मजबूत पदार्थांशी केली जाते.

Spider web strength

|

ESakal

‘नॅशनल क्रश'च्या घायाळ अदा, रसिका सुनीलचा साडीतील बोल्ड लूक पहाच

Rasika Sunil Bold Look

|

ESakal

येथे क्लिक करा