Aarti Badade
बैठ्या जीवनशैलीमुळे मणक्याच्या समस्यांचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढत आहे. प्रामुख्याने ३५ ते ५० वयोगटातील व्यक्तींना याचा अधिक त्रास होत आहे.
Spine pain
Sakal
तासनतास एकाच जागी बसून काम केल्यामुळे मणक्यावर अतिताण येतो. चुकीच्या पद्धतीने बसणे (Poor Posture) हे मणक्याच्या विकारांचे सर्वात मोठे कारण ठरत आहे.
Spine pain
Sakal
मणक्याच्या समस्या वाढल्यास आता घाबरण्याचे कारण नाही. 'रोबोटिक्स' आणि 'एआय' (AI) मुळे मणक्याच्या शस्त्रक्रिया आता अधिक अचूक आणि सुरक्षित झाल्या आहेत.
Spine pain
Sakal
आधुनिक 'मिनिमल इन्व्हेसिव्ह' तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेत कमीत कमी चिरफाड केली जाते. यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो.
Spine pain
Sakal
सतत बसून राहू नका. दर ४५ मिनिटांनी ५ मिनिटांचा ब्रेक घ्या, थोडे चाला आणि मणक्याला आराम देणारे सोपे 'स्ट्रॅचिंग' व्यायाम करा.
Spine pain
Sakal
काम करताना तुमची पाठ सरळ राहील आणि कॉम्प्युटर स्क्रीन डोळ्यांच्या समांतर असेल याची काळजी घ्या. एर्गोनॉमिक खुर्चीचा वापर मणक्यासाठी फायदेशीर ठरतो.
Spine pain
Sakal
जर पाठीत सतत वेदना होत असतील किंवा हात-पायांना मुंग्या येत असतील, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित मणकाविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Spine pain
Sakal
Kidney Detox Foods
Sakal