हे 6 प्राणी देतात शांतता, शक्ती आणि शुभ ऊर्जा!

Monika Shinde

मानव आणि प्राण्यांचे अतूट नाते

प्राचीन काळापासून मानव आणि प्राण्यांचे अतूट नाते राहिले आहे. विविध संस्कृतींमध्ये प्राण्यांकडे केवळ नैसर्गिक जीव म्हणून न पाहता, त्यांना विशेष आध्यात्मिक आणि सांकेतिक महत्त्व दिले गेले आहे

घरी किंवा कार्यालयात

आजही जगभरात अनेक लोक आपल्या घरी किंवा कार्यालयात अशा प्राण्यांची मूर्ती, चित्र किंवा चिन्ह ठेवतात जे शांती, ऊर्जा, यश, आरोग्य आणि सौख्य देतात असे मानले जाते.

हत्ती

हत्ती हा विशेषतः आशियाई संस्कृतींमध्ये अत्यंत शुभ मानला जातो. तो ताकद, समजूतदारपणा आणि सौम्यतेचं प्रतीक आहे. अनेक लोक घरामध्ये हत्तीचा सोंड वर असलेला फोटो किंवा मूर्ती ठेवतात.

घोडा

घोडा म्हणजे वेग आणि यशाचं प्रतीक. वास्तुशास्त्रातही घोडा अत्यंत शुभ मानला जातो. अनेक घरांमध्ये ७ धावत्या घोड्यांची चित्रं किंवा मूर्ती दिसतात, कारण त्या यश, पुढे जाण्याची प्रेरणा आणि उन्नतीचं प्रतीक असतात.

कोई मासा

कोई मासा सौंदर्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानला जातो, विशेषतः आशियाई संस्कृतींमध्ये. अनेकजण घरात किंवा बागेत छोटे तलाव तयार करून त्यात कोई मासे ठेवतात.

ससा

ससा गोंडस आणि सौम्य प्राणी आहे, जो प्रजननशक्ती आणि कृपेचं प्रतीक मानला जातो. त्यांच्या हलक्या उड्या आणि चपळ हालचाली अनेकांना आकर्षित करतात. घरात शोभेच्या वस्तूप्रमाणे सशाच्या मूर्ती देखील ठेवल्या जातात.

कासव

कासव दीर्घायुष्य, स्थिरता आणि हळूहळू पण निश्चित यशाचं प्रतीक आहे. विविध संस्कृतींमध्ये कासवाला शुभ मानलं जातं. अनेकजण घरात क्रिस्टलचा किंवा धातूचा कासव ठेवतात, ज्यामुळे दीर्घायुष्य, आरोग्य आणि शांतता मिळते असं मानतात.

कुत्रा

"माणसाचा सच्चा मित्र" म्हणून ओळखला जाणारा कुत्रा प्रेम, निष्ठा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा नाही, ते देखील घरात कुत्र्याच्या मूर्ती किंवा खेळणी ठेवतात, कारण त्या देखील घरात चांगली ऊर्जा निर्माण करतात.

वर्क बॅलन्स राखण्यासाठी काय करावं?

येथे क्लिक करा