स्पिरुलिना! शेवाळं पावडरची एक गोळी किती फायदेशीर ठरते?

संतोष कानडे

स्पिरुलिना

स्पिरुलिनाला आरोग्याचं सुपरफूड म्हटलं जातं. मागच्या काही दिवसांपासून हे फारच पॉप्युलर झालं आहे.

व्हिटॅमिन्स

स्पिरुलिनामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल आणि भरपूर प्रोटिन असतं. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी सर्व पोषक घटक यात असतात.

फायबर

प्रोटिन, फायबर, आयरन, विटॅमिन ए, विटॅमिन बी १२, फोलिक अॅसिड, कॉपर यासह इतरही पोषक घटक यात असतात.

६० ग्रॅम प्रोटिन

स्पिरुलिनामध्ये १८ व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. जर तुम्ही जेवणात १०० ग्रॅम स्पिरुलिनाचा समावेश करत असाल तर ६० ग्रॅम प्रोटिन मिळेल.

शुगर कंट्रोल

स्पिरुलिनाला प्रोटिनचा बेस्ट सोअर्स म्हटलं जातं. वजन कमी करण्यासाठी आणि शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी याची मदत होते.

कॅन्सर

यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय हृदयाचं आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे.

घातक

परंतु स्पिरुलिनाचं जास्त सेवन केलं तर ते घातक ठरु शकतं. अतिसार, सूज, डोकेदुखी, पोट खराबहोणे, पोट फुगणे, त्वचेला लालसरपणा, घाम येणे, स्नायू दुखणे असे आजार होऊ शकतात.

गोळी

स्पिरुलिनाची पावडर किंवा गोळी घेणं चांगलंच आहे. परंतु प्रत्येकाने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.

मुंग्या शेती करतात, पण कशी?

येथे क्लिक करा