बनावट QR कोड कसा ओळखाल? या टिप्स जाणून घ्या आणि वाचवा तुमचे पैसे!

Aarti Badade

पेमेंटसाठी क्यूआरचा वापर

आजकाल छोट्या-मोठ्या दुकानांनपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सर्वत्र क्यूआर कोडचा (QR Code) वापर पेमेंट करण्यासाठी केला जातो.

Sakal

बनावट क्यूआर कोडचा धोका

तुम्हाला माहीत आहे का? पडताळणीशिवाय क्यूआर कोड स्कॅन करणे हे एक मोठी समस्या बनू शकते आणि फसवणूक करणारे तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.

Sakal

ऑडिओ बॉक्स ऐका

पैसे भरल्यानंतर, दुकानातील ऑडिओ बॉक्समधून येणारा आवाज (Payment Confirmation Sound) नक्की ऐका. जर आवाज येत नसेल, तर सावध रहा.

Sakal

गुगल लेन्सने स्कॅन करा

तुम्हाला क्यूआर कोडवर विश्वास नसेल किंवा तो बनावट असल्याची शंका असेल, तर गुगल लेन्सने (Google Lens) स्कॅन करून एकदा नक्की चेक करा.

Sakal

मालकाचे नाव पडताळा

पेमेंट करताना स्क्रीनवर दिसणारे दुकानाचे किंवा मालकाचे नाव पडताळून पहा. जर नाव चुकीचे असेल, तर पैसे देऊ नका.

Sakal

अनोळखी कॉल आणि मेसेज

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून पैसे मागणारा कॉल किंवा मेसेज आला, तर अजिबात प्रतिसाद देऊ नका.

Sakal

त्वरित तक्रार करा

अशा अनोळखी नंबरवरून फसवणुकीचा प्रयत्न झाल्यास, त्या नंबरची त्वरित तक्रार करा आणि डिजिटल फसवणूक टाळा!

Sakal

JioHotstar चे सबस्क्रिप्शन आता फक्त १ रुपयात काय आहे भन्नाट प्लॅन...

JioHotstar

|

esakal

येथे क्लिक करा