Squirrel Gestation Period : एका वर्षात 'इतक्या' वेळा खारुताई पिल्लांना देते जन्म; गर्भधारणेचा किती असतो कालावधी?

बाळकृष्ण मधाळे

खारुताईला बाळंतपणासाठी किती दिवस लागतात?

घराभोवती, शेतात, बागेत किंवा उद्यानात खारुताईची चपळ धावपळ आपण नेहमीच पाहतो. त्यांच्या निरागस हालचाली आणि चुणचुणीत स्वभावामुळे कोणीही सहज मोहित होतो.

Squirrel Gestation Period

|

esakal

गर्भधारणेचा कालावधी किती असतो?

मात्र, या गोंडस दिसणाऱ्या खारुताईच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं बाळंतपण आणि त्यासाठी लागणारा कालावधी ऐकला तर अनेकांना आश्चर्य वाटू शकते.

Squirrel Gestation Period

|

esakal

खारुताई कुठे पिल्लांना जन्म देते?

मादी खार आपल्या पिल्लांसाठी सुरक्षित जागेच्या शोधात असते. त्यामुळे कधी कधी त्या घरांच्या अटारीत किंवा शांत, सुरक्षित कोपऱ्यात आश्रय घेतात. अशा ठिकाणी त्या आपल्या पिल्लांना जन्म देतात आणि त्यांचे संगोपन करतात.

Squirrel Gestation Period

|

esakal

खारुताईचे दोन प्रकार : Eastern Gray Squirrel आणि Red Squirrel

राखाडी खार साधारणतः काळसर किंवा तपकिरी रंगाची असते. तिचा गर्भधारणेचा कालावधी सुमारे ४० ते ४४ दिवसांचा असतो. म्हणजेच, साधारण दीड महिन्यानंतर ती पिल्लांना जन्म देते.

Squirrel Gestation Period

|

esakal

राखाडी आणि लाल खारीमध्ये काय फरक?

तर, लाल खारीच्या अंगावर लालसर केस असतात, कानांवर लहान केसांचे गुच्छे दिसतात आणि तिची शेपटी तुलनेने लहान असते. लाल खारीचा गर्भधारणेचा कालावधी ३३ ते ३५ दिवसांचा असतो, म्हणजेच साधारण एका महिन्यात ती पिल्लांना जन्म देते.

Squirrel Gestation Period

|

esakal

वर्षातून किती वेळा पिल्लांना जन्म देते?

राखाडी आणि लाल खारी या दोन्ही प्रजाती वर्षातून एकदा किंवा कधी कधी दोनदा पिल्लांना जन्म देतात. प्रत्येक वेळी त्या साधारण दोन ते सहा पिल्लांना जन्म देऊ शकतात.

Squirrel Gestation Period

|

esakal

छोट्या जीवांचे विलक्षण जीवनचक्र

निसर्गातील या छोट्या जीवांचे जीवनचक्र खरोखरच विलक्षण आहे. त्यांच्या चपळ हालचालींइतकेच त्यांच्या मातृत्वाचेही जग अनोखे आणि आश्चर्यकारक आहे.

Squirrel Gestation Period

|

esakal

Titavi Bird Death Myth : कर्कश आवाज अन् पुढं अपशकुन घडण्याचे संकेत! रात्री ओरडत टिटवी खरंच मृत्यूची चाहूल देते?

Titavi Bird Death Myth Explained

|

esakal

येथे क्लिक करा...