एसटीची ७७ वर्षे, पहिली बस पुणे-नगर; तिकीट किती होतं?

सूरज यादव

पहिली एस.टी. बस

एसटी महामंडळाची सुरुवात १ जून १९४८ रोजी अवघ्या ३६ निळ्या-चंदेरी बेडफोर्ड बसेसह झाली. बस पेट्रोलवर धावणारी, लाकडी बाकड्यांची, काथ्याच्या सीट्स असलेली, खिडक्यांना ताडपत्री असणारी ३० आसनांची होती.

MSRTC bus history | Esakal

एसटी कार्यशाळेत बनलेली पहिली बस

१९५० मध्ये सांताक्रूझ (मुंबई) येथील एसटीच्या कार्यशाळेत लेलँड कंपनीच्या सांगाड्यावर पहिली बस तयार झाली. सुरुवातीला संपूर्ण बस धातूमध्ये बनवली जात असे. यासाठी साहित्य बेंगळुरू, हैदराबाद, मद्रास येथून आयात केले जात.

MSRTC bus history | Esakal

पहिली आराम बस - १९५०

मॉरिश कमर्शियल कंपनीच्या आराम बस पुणे-महाबळेश्वर मार्गावर धावायला लागल्या. निलकमल आणि गिर्यारोहिणी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या २x2 बसमध्ये पडदे आणि घड्याळासारख्या सुविधा होत्या.

MSRTC bus history | Esakal

पहिली लाल-पिवळी बस - १९६०

दापोडी कार्यशाळेने टाटा मर्सडीज बेंझ सांगाड्यावर ५० आसनी रुंद बस तयार केली. निळ्या-चंदेरी ऐवजी लाल-पिवळा रंग वापरला गेला. गंजरोधक अॅल्युमिनियमपासून बस तयार झाली. भारत-चीन आणि भारत-पाक युद्धांच्या काळात दापोडी कार्यशाळेने आपत्कालीन ८० बसेस तयार करून संरक्षण खात्याला दिल्या.

MSRTC bus history | Esakal

लक्झरी अन् एसी बस

दापोडीत तयार झालेल्या आराम बसमध्ये पडदे, आरसा, घड्याळ, पंखे आणि रेडिओ-स्पीकर्स होते. २x2 सीट मांडणी, ३० आसनांची क्षमता आणि सुंदर निळा-पांढरा रंग यामुळे ही बस विशेष होती. त्यानंतर १९६५ मध्ये एसटीने तयार केलेली पहिली एसी बस दापोडीत बनली.

MSRTC bus history | Esakal

लालपरीने टाकली कात

दापोडी कार्यशाळेने बनवलेल्या १९६७ मध्ये दुमजली बसमध्ये लेलँड ट्रॅक्टर आणि महिंद्राचा ट्रेलर भाग होता. ही १०७ आसनी बस नाशिक ते नाशिक रोड मार्गावर धावत असे. तर १९७० मध्ये व्हायकिंग सांगाड्यावर तयार झालेल्या बसमध्ये इंजिन पुढे आणि दरवाजाही पुढे होता.

MSRTC bus history | Esakal

एशियाड बस - १९८२

दिल्लीतील आशियाई स्पर्धांसाठी एसटीने २०० आराम बस तयार केल्या होत्या. यातील ५० बस दादर-पुणे मार्गावर एशियाड ब्रँडने चालवण्यात आल्या. या बसेसने प्रवाश्यांच्या मनात खास स्थान मिळवलं.

MSRTC bus history | Esakal

पुणे-नगर पहिली फेरी

एसटी महामंडळाची महाराष्ट्रातली पहिली बस पुणे ते अहमदनगर अशी धावली. आज या मार्गावर बसचं तिकिट २०० रुपयांच्या वर आहे. पण १९४८ ला पहिल्या बस फेरीवेळी त्याचं भाडं फक्त ८ आणे म्हणजेच ५० पैसे इतकं होतं.

MSRTC bus history | Esakal

भारतातलं एक गाव जिथं फक्त महिलाच हॉटेल चालवतात, कारण काय?

The Women Village Also Buari Gaon Of Uttarakhand | ESakal
इथं क्लिक करा