Mansi Khambe
स्टेनलेस स्टीलचा वापर आपल्या घरातील भांडी, किचन सिंक, पाण्याच्या बाटल्या, चमचे, रेलिंग आणि अगदी मोठ्या कारखान्यांतील यंत्रांमध्येही केला जातो.
Steel Not Rust Reason
ESakal
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, लोखंडापासून बनवलेले स्टेनलेस स्टीला गंज का लागत नाही? स्टेनलेस स्टील दीर्घकाळ आपली चमक का टिकवून ठेवते? याबाबत जाणून घ्या.
Steel Not Rust Reason
ESakal
स्टेनलेस स्टील बनवण्यासाठी लोखंडात 'क्रोमियम' धातू मिसळला जातो. हा धातू त्याला सामान्य लोखंडापेक्षा अधिक गंजरोधक बनवतो.
Steel Not Rust Reason
ESakal
तर स्टेनलेस स्टीलच्या काही प्रकारांमध्ये निकेल आणि मॉलिब्डेनमसारख्या इतर धातूंचे मिश्रणही केले जाते.
Steel Not Rust Reason
ESakal
स्टेनलेस स्टील तयार करण्याची प्रक्रिया मोठ्या कारखान्यांमध्ये सुरू होते. गरजेनुसार लोखंडात क्रोमियम आणि इतर धातू मिसळले जातात. हे मिश्रण नंतर मोठ्या भट्ट्यांमध्ये तीव्र उष्णतेखाली वितळवले जाते.
Steel Not Rust Reason
ESakal
धातू वितळल्यानंतर, मिश्रणातील अशुद्धी आणि कार्बनचे प्रमाण देखील नियंत्रित केले जाते. तयार झालेले स्टील नंतर थंड करून घट्ट केले जाते. त्यानंतर यंत्रांद्वारे आकार दिले जातात.
Steel Not Rust Reason
ESakal
स्टेनलेस स्टीलचा पृष्ठभाग हवेतील किंवा पाण्यातील ऑक्सिजनच्या संपर्कात येतो, तेव्हा क्रोमियम ऑक्सिजनसोबत अभिक्रिया करून क्रोमियम ऑक्साईडचा एक पातळ थर तयार करतो, हे एका संरक्षक कवचाप्रमाणे काम करते.
Steel Not Rust Reason
ESakal
कारखान्यात स्टील तयार झाल्यानंतर, त्याचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अनेक प्रक्रिया वापरल्या जातात. स्वच्छता, पिक्लिंग, पॅसिव्हेशन, पॉलिशिंग या सर्व प्रक्रियांचा यात समावेश आहे.
Steel Not Rust Reason
ESakal
स्टेनलेस स्टीलचा अर्थ असा नाही की त्याला कोणत्याही परिस्थितीत गंज लागणार नाही. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की ते सामान्य लोखंडापेक्षा गंजण्यास अधिक चांगला प्रतिकार करते.
Steel Not Rust Reason
ESakal
Banana
esakal