Aarti Badade
सब्जा बिया शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी करतात आणि उन्हाळ्यातील त्रास टाळतात.
या बिया पाणी शोषून घेतात आणि शरीराला दीर्घकाळ हायड्रेटेड ठेवतात.
फायबरयुक्त सब्जा बिया पचन सुधारतात, बद्धकोष्ठता कमी करतात आणि पोट हलकं ठेवतात.
या बियांमध्ये असणारे पोषकतत्त्व शरीराला ताजेतवाने ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात.
पोट भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
फक्त 10-15 मिनिटं पाण्यात भिजवा आणि ते कोणत्याही थंड पेय, लिंबूपाणी, नारळपाणी, स्मूदीमध्ये मिसळा.
रोज फक्त एक चमचा सब्जा बिया खाणं ही छोटी सवय तुमचं संपूर्ण आरोग्य सुधारू शकते.उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी रामबाण उपाय आहे.