Aarti Badade
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते आणि यामुळे सर्दी, खोकला, ताप, अपचन असे आजार सहज होतात. त्यामुळे आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
या काळात काही भाज्या टाळाव्यात, पण काही विशिष्ट हिरव्या भाज्या या काळात आरोग्यासाठी वरदान ठरतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि पचन सुधारतात.
कारला पचनासाठी उत्तम असून ते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि पचनक्रिया सुधारते.
पावसात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी दुधी भोपळा अत्यंत उपयुक्त आहे. पचायला हलका आणि पोषणमूल्यांनी भरलेला असतो.
या भाजीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन C भरपूर असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामुळे तुम्ही पावसाळ्यात आजारांपासून दूर राहता.
तोंडली शरीरासाठी खूप फायदेशीर असून त्यात प्रथिने, लोह आणि कमी कॅलरीज असतात. पावसात पोट स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त.
या चार भाज्या तुमच्या पावसाळी आहारात समाविष्ट केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुमचे पचन सुधारेल. आजारांपासून बचाव करण्यासाठी हे नैसर्गिक उपाय निश्चितच उपयुक्त आहेत.