Aarti Badade
एक सोपी, झटपट आणि आरोग्यदायी डिश
काकडी, दही आणि मसाल्यांपासून बनवलेली ही कोशिंबीर तुम्हाला दिलासा देईल.
१ मोठी काकडी (बारीक चिरलेली),1/2 कप दही,1/4 टीस्पून भाजलेले जिरेपूड,1/4 टीस्पून काळे मीठ,1/4 टीस्पून पिठीसाखर (आवश्यक असल्यास),बारीक चिरलेली कोथिंबीर,1/2 हिरवी मिरची (ऐच्छिक)
१. एका भांड्यात दही घेऊन ते चांगले फेटा.
२. त्यात जिरेपूड, काळे मीठ, साखर, आणि मिरची घाला.
३. सगळं एकत्र मिसळा.
४. त्यात चिरलेली काकडी आणि कोथिंबीर घाला.
५. सगळं नीट मिक्स करा.
६. 10-15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.
मिरची आणि मीठ चवीनुसार घालता येते,शेंगदाणे कुट घालून स्वाद वाढवा,शिंगाडा पीठ/राजगिरा पीठ घालून डिश अधिक उपयुक्त बनवा.
थंडगार कोशिंबीर तयार! उपवासात ताजेपणा आणि चव एकत्र अनुभवायला विसरू नका!