संतोष कानडे
तुम्ही कधी साखरेचा पानांबद्दल ऐकलं आहे का? पण हे खरं आहे. एक शुगरची वनस्पती आहे.
साखर किंवा गुळाला उत्तम पर्याय म्हणून या वनस्पतीकडे बघितलं जातं.
या वनस्पतींच्या पानांमध्ये साखरेपेक्षा शंभर पटींनीही अधिक गोडवा आहे.
या वनस्पतीचं नाव आहे स्टिव्हीया. याची पानं सुकून त्यापासून पावडर तयार करता येते.
ही पावडर चहासह इतर गोड पदार्थांमध्ये वापरता येते. विशेष म्हणजे ही हेल्दी शुगर आहे.
स्टिव्हीयामध्ये अत्यंत कमी कॅलरीज् असतात. त्यामुळे ही पानं मधुमेहावर उपयुक्त ठरतात.
महाराष्ट्रात नागपूर, अकोला, पंढरपूर यासह इतर भागांमध्ये या वनस्पतीचं पिक घेण्यात येत आहे.
काही भागात नर्सरीमध्ये ही रोपे उपलब्ध आहेत. ते तुम्ही घरामध्ये वाढवू शकता. याची उंची तीन फुटापर्यंत जाते.
तीन महिन्यांचं रोप झाल्यानंतर त्याची कापणी करावी लागते. घरातल्या कुंडीमध्येही ही रोपं येऊ शकतात.
इतर देशांमध्ये स्टिव्हीयाची शेती केली जाते. बाजारात याची पावडर किंवा क्युब विक्रीसाठी उपलब्ध असतात.