8 तास झोपूनही थकवा? तुमच्या शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता असू शकते

Aarti Badade

पूर्ण झोप, तरीही थकवा?

८ तास झोपूनही थकवा जाणवणे हे केवळ तणावामुळे नाही, तर जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

Sakal

शरीर

सकाळी उठल्यावर शरीर जड, आळशी वाटणे हे शारीरिक ऊर्जेच्या अभावाचे संकेत आहेत.

Sakal

व्हिटॅमिन D ची कमतरता

व्हिटॅमिन D हाडे मजबूत करून शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते, याची कमतरता थकवा येण्याचे छुपे कारण आहे. दिवसभर सुस्ती, स्नायू दुखणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे.

Sakal

व्हिटॅमिन D कमतरतेवर उपाय

दररोज सकाळी १५-२० मिनिटे उन्हात बसा (सूर्यप्रकाश), याला 'सनशाईन व्हिटॅमिन' देखील म्हणतात. आहारात अंडी (पिवळा बलक), मशरूम आणि चरबीयुक्त मासे (उदा. सॅल्मन) यांचे सेवन करा.

Sakal

व्हिटॅमिन B12 ची कमतरता

B12 लाल रक्तपेशी आणि ऊर्जा निर्मितीस मदत करते, कमतरतेमुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन थकवा येतो. याची लक्षणे म्हणजे अशक्तपणा, चक्कर येणे आणि हातापायात मुंग्या येणे.

Sakal

व्हिटॅमिन B12 कमतरतेवर उपाय

दूध, दही, चीज, अंडी आणि मांस यांसारखे पदार्थ खाऊन B12 ची कमतरता दूर करा. शाकाहारी लोकांसाठी आणि पचनशक्ती कमी झालेल्यांसाठी पूरक आहार (Supplements) आवश्यक असू शकतो.

Sakal

पोषक घटक

लोह (Iron), मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या खनिजांच्या कमतरतेमुळेही थकवा जाणवतो. लोहामुळे अशक्तपणा येतो, तर मॅग्नेशियम स्नायू संतुलित ठेवते.

Sakal

उपाय काय?

हे पोषक घटक पूर्ण करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, बियाणे आणि संपूर्ण धान्य (Whole Grains) खा. थकवा कायम असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून संतुलित आहार घ्या.

Sakal

कोलेस्ट्रॉलचा त्रास? हा मसाला आहे रामबाण उपाय!

Sakal

येथे क्लिक करा