Monika Shinde
सुरुवातीला गॅस्ट्रिक कॅन्सरची लक्षणे सामान्य पचनाच्या समस्या वाटतात. पण वेळेत लक्ष दिल्यास हा गंभीर आजार टाळता येतो.
मलाचा आकार, वारंवारता किंवा सघनपणात बदल, तसेच मलामध्ये रक्त दिसणे ही चेतावणी आहे. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटात कायमची वेदना किंवा जळजळ जाणवणे गॅस्ट्रिक कॅन्सरचे संभाव्य लक्षण आहे. वेदना वाढत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
भूक कमी जाणवणे किंवा पूर्णपणे न लागणे गंभीर समस्या दर्शवते. पोटात अल्सर किंवा गाठ असल्यास त्वरित तपासणी करून घ्या.
कोणताही प्रयत्न न करता वजन घटत असल्यास ही गंभीर चेतावणी आहे. अशावेळी डॉक्टरांकडे त्वरित संपर्क साधा.
छातीत सतत जळजळ, अॅसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखं वाटणे गॅस्ट्रिक कॅन्सरची लक्षणं असू शकतात. त्रास वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
जर कॅन्सर अन्ननलिकेत पसरला असेल, तर खाणं गिळण्यात त्रास, खोकला किंवा श्वास घेण्यास अडचण जाणवू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.