Aarti Badade
फळे आणि भाज्या आरोग्यदायी असतात, पण त्या योग्य वेळी खाणे तितकेच महत्त्वाचे आहे. काही 'निरोगी' पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच करतात.
केळीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे असली तरी, सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढून ऍसिडिटी होऊ शकते. जेवणानंतर केळी खाणे नेहमीच चांगले.
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास त्यातील कॅफिनमुळे ऍसिडिटी होऊ शकते. जर तुम्हाला सकाळी कॉफी प्यायची सवय असेल, तर आधी काहीतरी हलके खा आणि मग कॉफीचा आस्वाद घ्या.
दह्यातील प्रोबायोटिक्स पचनास मदत करतात, पण रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. दही नेहमी दिवसा किंवा दुपारच्या जेवणासोबत खावे.
टोमॅटोमध्ये सायट्रिक आणि टॅनिक ऍसिड असते, तर संत्री, लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असते. रिकाम्या पोटी खाल्ल्यास ऍसिडिटी आणि गॅस होऊ शकतो.
कच्च्या भाज्यांमध्ये फायबर जास्त असल्याने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्या दिवसा किंवा दुपारच्या जेवणासोबत खाणे अधिक योग्य आहे.
आरोग्यदायी पदार्थ खाणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते योग्य वेळी खाणेही आवश्यक आहे. रिकाम्या पोटी कोणते पदार्थ टाळावे हे जाणून घेतल्यास तुम्ही पोटाच्या अनेक समस्यांपासून दूर राहू शकता.