ट्रेंडिंग हळद केवळ शो नाही, हे पाणी आहे अमृतासमान! वाचा भन्नाट फायदे

Aarti Badade

मॅजिकल हळदी स्प्लॅश: सोशल मीडियावर धुमाकूळ!

तुम्ही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला 'मॅजिकल हळदी स्प्लॅश' ट्रेंड पाहिला असेलच. एका ग्लास पाण्यात हळद शिंपडून, खालून टॉर्चचा प्रकाश टाकल्यावर एक सोनेरी चमक दिसते, जी अगदी जादूसारखी वाटते.

Surprising Health Benefits of the Viral Turmeric water | Sakal

हळदीतील 'कर्क्यूमिन'ची कमाल आणि टिंडल प्रभाव!

ही हळद चमकदार का दिसते याचा कधी विचार केला आहे का? यामागे हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे नैसर्गिक रंगद्रव्य आणि टिंडल प्रभाव हे वैज्ञानिक कारण आहे. कर्क्यूमिनचे कण प्रकाशाला पसरवतात आणि म्हणूनच ती सोनेरी चमकासारखी दिसते.

Surprising Health Benefits of the Viral Turmeric water | Sakal

हा ट्रेंड फक्त जादू नाही, एक विज्ञान प्रयोग!

हा व्हायरल ट्रेंड केवळ रोमांचकच नाही तर एक सोपा विज्ञान प्रयोग देखील आहे. यासाठी फक्त हळद, पाणी आणि मोबाईल टॉर्चची आवश्यकता असते. अंधार होताच, पाण्यात हळद टाकल्याने ही चमत्कारी सोनेरी चमक निर्माण होते.

Surprising Health Benefits of the Viral Turmeric water | Sakal

त्वचेसाठी हळदीचा जादुई स्पर्श!

हीच हळद, जी पाण्यात जादू करते, ती तुमच्या शरीरावर आणि त्वचेवरही जादुई परिणाम दाखवते. कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी ठरतात.

Surprising Health Benefits of the Viral Turmeric water | Sakal

हृदय, किडनी आणि मधुमेहासाठी हळद आहे फायदेशीर!

कर्क्यूमिन हृदयविकार, त्वचेच्या समस्या आणि संधिवात यांसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करते. मूत्रपिंडांच्या दुखापती बरी करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग तसेच मधुमेहाचा धोका कमी करण्यास देखील फायदेशीर ठरू शकते.

Surprising Health Benefits of the Viral Turmeric water | Sakal

जळजळ कमी करते, डागांशी लढते!

अमेरिकन आरोग्य संस्था NIH च्या अहवालानुसार, कर्क्यूमिनमध्ये शरीरातील जळजळ कमी करण्याचे, मुरुम आणि डागांशी लढण्याचे आणि काळे डाग हलके करण्याचे गुणधर्म आहेत. हे त्वचेचे वय वाढवणाऱ्या मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव देखील कमी करते.

Surprising Health Benefits of the Viral Turmeric water | Sakal

सकाळी हळदीचे पाणी प्या, निरोगी राहा!

हळदीचे हे अनेक गुणधर्म पाहता, सकाळी रिकाम्या पोटी ते पाण्यासोबत किंवा दुधात मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यासाठी हे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लक्षात ठेवा, कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Surprising Health Benefits of the Viral Turmeric water | Sakal

तुमचं यकृत धोक्यात आहे का? 'या' गंभीर कारणांकडे दुर्लक्ष करू नका!

liver disease symtoms | Sakal
येथे क्लिक करा