रोज 5 कप चहा पिताय? शरीरावर होतील 'हे' भयंकर परिणाम!

Aarti Badade

चहाचे व्यसन की आवड?

चहा प्रत्येकालाच आवडतो, पण दिवसातून वारंवार चहा पिण्याची सवय तुम्हाला संकटात टाकू शकते. प्रमाणाबाहेर चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

Tea Side Effects

|

Sakal

कॅफीनची मर्यादा ओळखा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात शरीरात २०० ते ३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफीन जाता कामा नये. जर तुम्ही ५-६ कप चहा घेत असाल, तर तुम्ही ही मर्यादा ओलांडत आहात.

Tea Side Effects

|

sakal

झोपेवर होतो गंभीर परिणाम

चहामधील कॅफीनमुळे मेंदू उत्तेजित होतो. जास्त चहा पिल्याने निद्रानाश (Insomnia) म्हणजेच झोप न लागण्याची समस्या निर्माण होते आणि मानसिक थकवा वाढतो.

Tea Side Effects

|

Sakal

हृदयाची धडधड वाढणे

अति चहामुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. कॅफीनच्या अतिसेवनाने अस्वस्थता वाटणे आणि हृदयाची धडधड वाढणे (Palpitations) असे त्रास उद्भवतात.

Tea Side Effects

|

Sakal

ॲसिडिटी आणि पोटाचे विकार

रिकाम्या पोटी किंवा जास्त चहा पिल्यामुळे पोटात जळजळ, ॲसिडिटी आणि पचन बिघडण्याच्या समस्या निर्माण होतात.

Tea Side Effects

|

Sakal

ॲनेमिया

यामुळे शरीरातील लोहाचे (Iron) शोषण कमी होऊन 'ॲनेमिया'चा धोका वाढतो.

Tea Side Effects

|

Sakal

किती चहा पिणे सुरक्षित?

ताजेतवाने वाटण्यासाठी दिवसातून १ ते २ कप चहा पुरेसा आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी चहाचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि स्वतःला फिट ठेवा.

Tea Side Effects

|

Sakal

अपेंडिक्सकडे दुर्लक्ष करू नका! ही 7 लक्षणे दिसताच व्हा सावध

Appendix symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा